जीवनपरिचय

कॉ.पी.बी.कडू पा.जीवन परिचय
·       शेतकरी कुटुंबात जन्म झाला.वडील बापूजी कडू पाटील .
·       चुलते नानासाहेब कडू पाटील हे पंचक्रोशीतील दिलदार व कर्तृत्वान शेतकरी म्हणून प्रसिध्द होते.
·       सासरे कोल्हार येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते कै.सखाराम हरी लामखेडे गुरुजी.
·       लामखेडे गुरुजी थोर अर्थशास्त्रज्ञ धनंजयराव गाडगीळ यांचे घनिष्ठ स्नेही होते.त्यांच्या नेतृत्वाखाली कै.इंगळे मास्तर,टेकावडे बाबा,ग.रऔताडे,शंकरराव आबा धुमाळ विठ्ठलराव विखे पाटील व इतर अनेकांबरोबर प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या निर्मितीमध्ये व स्थापनेत त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता.
·       कॉ.कडू पाटील हे विद्यार्थी दशेत संगमनेर येथे असताना त्यांनी विद्यार्थी वसतिगृह चालवले.
·       १९४२ च्या महात्मा गांधींच्या चलेजाव चळवळीत त्यांनी उडी घेतली.
·       या स्वातंत्र्य चळवळीत त्यांच्याबरोबर अण्णासाहेब शिंदे,धर्माजी पोखरकर,भाऊसाहेब थोरात,पी.जी.भांगरे,चंद्रभान आठरे पाटील (मा.खासदार),रावसाहेब शिंदे असे अनेक सहकारी होते.
·       स्वातंत्र्य चळवळीत याच पर्वात त्यांच्या एस. एम. जोशी यांच्याबरोबर कॉ.कडू पाटील तथा आप्पाही सहआरोपी होते .
·       स्वातंत्र्य चळवळीत याच पर्वात अप्पांचा  एस.एम.गोशी,ना.ग.गोरे,साने गुरुजी ,एस.एम.जोशी यांच्याबरोबर घनिष्ठ संबंध आला.
·       स्वातंत्र्य चळवळीनंतर आप्पा पुन.शिक्षणाकडे वळले.बडोदा व पुणे येथून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.
·       घरातून शिक्षणाला विरोध होता.त्यामुळे अधे मधे नोकरी करून त्यांनी शिक्षण पूर्ण करून राहुरी येथे वकिली व्यवसाय सुरु केला .
·       त्यांचा हा वकिली व्यवसाय धंधा म्हणून न करता शेतकरी,शेतमजूर आदिवासींचीच वकिली त्यांनी जशी आयुष्यभर केली तशीच न्यायालयातही केली .
·       येणाऱ्या पक्षाकाराकडे फीची मागणी तर सोडाच, उलट त्याने मागितल्यास परतीच्या प्रवासासाठी आप्पा पैसे देत .
·       राहुरी,संगमनेर,अकोले,येथील न्यायालयांमध्ये गरिबांचे वकील म्हणूनच अप्पांची ख्याती होती
·       अप्पांनी स्वातंत्रचळवळीनंतर  कम्युनिस्ट पक्षाच्या राजकारणात प्रवेश केला .
·       कम्युनिस्ट पक्षावर बंदी असताना अप्पांनी भूमिगत राहूनही कार्य केले .
·       यातूनच त्यांनी शेतकरी,भूमिहीन,आदिवाशी,व दलितांसाठीच्या,राजकारण व समाजकारणाशी आयुष्यभरासाठी बांधिलकी जपली.
·       कम्युनिस्ट पक्षकार्यात असताना अनेक राष्टीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात भाग घेतला .
·        महाराष्ट्रातील खंडकरी चळवळ अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट पक्षाने हाती घेतली होती .त्यांच्या नंतर मनमाड येथील कॉ.माधवराव गायकवाड यांनी त्या चळवळीचे नेतृत्व केले .त्यांच्याच  बरोबरीने अप्पांनीही चळवळीचे नेतृत्व केले.
·       जिल्हा परिषदेच्या आधी लोकल बोर्डमध्ये अप्पांनी अनेक वर्ष कार्य केले .त्यात कलेक्टर अध्यक्ष असलेल्या जिल्हा ग्रामपंचायत बोर्डाचे उपाध्यक्ष म्हणूनही कार्य केले .
·       कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विधानसभेच्या १९५२,१९६२,व १९७२ च्या निवडणुका अप्पांनी लढविल्या .१९७२ च्या निवडणुकीत त्यांनी राहुरी मतदार संघाचे विधानभेत प्रतिनिधित्व केले
·       सहकारातही अप्पांचा सहभाग अतंत्य महत्वपूर्ण राहिला .प्रवरा कारखान्याच्या स्थापनेचा काळ वगळता सुरुवातीपासूनच अप्पांचा सहभाग कारखान्याच्या कारभारात होता .
·       प्रवरा कारखान्याचे कारभारी म्हणूनही अप्पांनी कारभार सांभाळला .अशाच पद्धतीने राहुरी कारखान्यातही अप्पांनी आपला वेगळा दबदबा निर्माण केला होता.
·       कृषी कुळात जन्मलेल्या अप्पांनी काळ्या आईच्या सेवेसाठी आयुष्य भर अपार मेहनत घेतली .परिसरातील एक उत्कृष्ट शेतकरी म्हणून अप्पांचा लौकिक होता.राहुरीच्या कृषीविद्यापीठावर पदाधिकारी म्हणून काम करताना त्यांनी स्वताची संशोधक वृत्तीही जोपासली .त्यातूनच कॉंग्रेस गावातला मारक ठरणाऱ्या गावाताचाही त्यांनी मागोवा घेतला .
·       रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अप्पांनी शिक्षण क्षेत्रातही महत्वाचे योगदान दिले .कर्मवीर भाऊराव पाटील तथा अण्णांना सात्रळ येथे समक्ष आणून माध्यमिक विद्यालय सुरू केले .तेव्हापासून त्यांचे कर्मवीरांशी नाते जुळले शेवटपर्यंत.
·       रयतच्या कामात त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला .रयतच्या नगर विभागाचे ते अनेक वर्ष अध्यक्ष होते .त्या काळात जिल्हाभर फिरून त्यांनी देणग्या गोळा केल्या आणि अनेक शाखांचा विकास घडवून आणला .
·       रयतच्या अनेक उच्चाधिकार समित्यांवरही त्यांनी काम केले.मा.शरद पवार यांचे अध्यक्षतेखाली संस्थेचे उपाध्यक्ष पदही त्यांनी भूषविले .
·       अनेक वर्ष ते अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत होते .हे कार्य करताना डॉ.श्रीराम लागू ,निळूभाऊ फुले यांच्याशी त्यांचा विशेष लोभ जडला.स्वत पूर्ण नास्तिक असूनही वारकरी संप्रदायातील अनेकांशी व्यक्तिगत पातळीवर त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते.



No comments:

Post a Comment