शैक्षणिक कार्य

कॉ.पी.बी.कडू पाटील यांचे शैक्षणिक कार्य

          समाजजीवनात आर्थिक विकासाला जर शैक्षणिक विकासाची जोड मिळाली तर सर्वांगीण परिवर्तन होऊ शकते असे कॉ.पी.बी.कडू पाटील यांना वाटत होते .म्हणूनच त्यांनी सामाजिक उपक्रमाबरोबर शैक्षणिक उपक्रम राबवलेले.
                    प्रवरा एजुकेशन सोसायटी स्थापनेमध्ये त्यांचा पुढाकार होता.तसेच ते या संस्थेचे संस्थापक विश्वस्त होते .त्यांच्या पुढाकारातूनच प्रवरा पब्लिक स्कूल ,प्रवरा आर्ट्स,कॉमर्स,सायन्स कॉलेज ,प्रवरा इंजिनिअरिंग कॉलेज ,प्रवरा डिप्लोमा कॉलेज ,सुरु करून प्रवरा परिसरातील गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळण्यासाठी  त्यांनी या संस्था स्थापन करण्यात पुढाकार घेतला .
        त्याचबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी रयतचे हायस्कूल सुरु करून त्यांना आर्थिक आधार दिला . स्वता च्या  सात्रळ गावासह आश्वी .कोल्हार ,भगवती,लोणी,निर्मळ पिंपरी ,राहता अशा अनेक ठिकाणी रयतचे हायस्कूल काढण्यास मदत केली.

                 लाखो रुपयांच्या देणग्या स्वमिळकतीची मालमत्ता विकून दिल्या.अनेक गरीब  मुलांना शिक्षणासाठी शैक्षणिक फी रूपाने मदत केली 

No comments:

Post a Comment