कॉ.पी.बी.कडू पाटील यांचे
स्वातंत्रोत्तर काळातील
योगदान
सप्टेंबर १९४४ मध्ये जेलमधून सुटका झाल्यानंतर कॉ.पी.बी.कडू
पाटील यांनी गोरगरीबांसाठी,शेतकऱ्यांसाठी व कामगारांसाठी लढायचे तर कम्युनिस्ट पक्षामध्ये दाखल होण्यासाठी पर्याय नाही असे
त्यांना वाटत होते म्हणून त्यांनी इ .स १९४६ मध्ये गुहा तालुका राहुरी येथील कम्युनिस्ट
पक्ष्याच्या शिबिरामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि आयुष्यभर कम्युनिस्ट म्हणून जगले
.पक्षाच्या आदेशानुसार त्यांनी पक्षाच्या वतीने त्यांनी अनेक निवडणुका लढवल्या .कधी
अपयश तर कधी यश मिळाले पण अपयशाने खचून न
जाता त्यांनी पक्षाचे आदेश पाळले.
इ.स.१९७२ मध्ये राहुरी विधानसभा मतदार संघातून
ते आमदार झाले .विधानसभेत त्यांच्यासह कम्युनिस्ट पक्षाचे दोनच आमदार होते .याच
काळामध्ये महाराष्ट्रामध्ये फार मोठा दुष्काळ पडला तेव्हा आमदार म्हणून त्यांनी
अनेक ठिकाणी दुष्काळी कामे सुरु करून रोजगार हमीचा कायदा करण्यास भाग पाडले .धरण्ग्रस्थांसाठी
आधी पुनर्वसन मग धरण असा कायदा विधानसभेत सरकारला करण्यास भाग पाडले .विधानसभेत
असंख्य प्रश्न विचारून गोरगरीब ,कष्ठकरी शेतकरी ,कामगार यांच्या प्रश्नांना वाचा
फोडली राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत,अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होऊन
त्यांनी अभ्यासपूर्ण विचार विधानसभेत मांडले.
आजी
माजी कम्युनिस्ट विचारी लाकांचा त्यांनी मेळावा घेतला.यामुळे
पक्ष सोडून गेलेले व पक्षातील अशा दोन्ही कार्यकर्त्यांमधील कटुता कमी झाली .स्वातंत्र्यसैनिकांचे
प्रश्न सोडविण्यासाठी ,त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रातील
स्वातंत्र्यसैनिकांचा एक मेळावा कॉ.कडू पाटील यांनी आयोजित केला होता.व्यक्ती व
समाजाचे भौतिक जीवन सुखी व समृद्ध करणे हाच राजकारणाचा,समाजकारणाचा प्रमुख उद्देश
मानून व सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन त्यांनी कार्य केले आहे .सामान्य माणूस हा त्यांच्या
विचार कार्याच्या केंद्रस्थानी राहिलेला आहे.
राजकारणाबरोबर सहकार चळवळीत कॉ .पी.बी.कडू पाटील यांचा महत्वपूर्ण सहभाग
होता.गावातील सहकारी सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी सहकार चळवळीत काम करण्यास
सुरवात केली.सात्रळ या त्यांच्या गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे
ते इ.स १९६८ ते १९९८ पर्यंत ३० वर्ष बिनविरोध चेअरमन होते .सोसायटीच्या माध्यमातून
नागरिकाना स्वस्त दराने जीवन उपयोगी वस्तू,धान्य पुरवठा करण्यास सुरुवात केली .त्याप्रमाणे
इ.स १९५७ मध्ये प्रवरा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवून संचालक झाले .व पुढे
इ.स १९६६ मध्ये प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन झाले .इ.स.१९७५ पर्यंत ते
प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते.
या काळात शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखान्यात सतत संघर्ष केला .तसेस राहुरी
कारखान्यामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी प्रस्थापितांशी झगडा करावा लागला .इ.स
.१९७०मध्ये राहुरी कारखान्याच्या निवडणुकीत कॉ.पी बी.कडू पाटील यांच्या मंडळाची सत्ता
आली होती .इ.स १९७५ ते १९८५ असे दहा वर्ष मुळा प्रवरा सहकारी वीज सोसायटीचे ते
संचालक होते.येथे हि त्यांनी कोणतेही नियमबाह्य काम केले नाही.पण संचालक असूनही
मीटर तपासणी कामामध्ये शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासामुळे त्यांनी वीज सोसायटीवर
मोर्चा काढला.कॉ.पी.बी.कडू पाटील यांचा सर्वासामान्यासाठींचा लढा फक्त राजकीय
क्षेत्रापुरता मर्यादित नव्ह्ता तर सहकार क्षेत्रामध्ये ही विधायक व चांगल्या
कामासाठी ते लढले .
No comments:
Post a Comment