सामाजिक कार्य

कॉ.पी.बी.कडू पाटील यांचे सामाजिक कार्य

     कॉ.पी.बी.कडू पाटील यांनी अनेक सामाजिक प्रश्न सोडवताना महागाई विरोधी लढा ,मुला डाव्या कालव्यासाठी प्रयत्न ,भूमिहीनांना जमीन मिळण्यासाठी प्रयत्न ,खंडकरी चळवळीतील सहभाग ,सिलिंग व कुळ कायद्यासाठी प्रयत्न ,अंद्धश्रद्धा निर्मूलनाचे कार्य ,कडू गवताचा शोध इ.बाबतीत भरीव योगदान दिले.
        देशामध्ये इ.स .१९६५ मध्ये अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊन महागाई वाढत होती .हीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली होती .त्यामुळे सर्वसामान्य माणूस ,कामगार,शेतकरी यांचे जगणे अवघड झाले होते.म्हणून कमुनिस्ट पक्षातर्फे महागाई विरोधी कृती समिती स्थापन करून आंदोलने छेडण्यात आली .राहुरी तालुक्यातील मुला धरणाला एकच उजवा कालवा काढण्याचे आराखड्यामध्ये ठरवण्यात आले .तेव्हा कॉ.पी.बी.कडू पाटील यांनी या धरणाला डावा कालवा काढण्यासाठी जनआंदोलन उभारले व मुला धरणाला डावा कालवा काढण्यास भाग पाडले .

                           त्याचप्रमाणे खंडकरी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळाव्या आणि कमी खंड असणाऱ्यांना खंड वाढवून मिळावा म्हणून कॉ.पी.बी.कडू पाटील यांनी कोपरगाव ,श्रीरामपूर ,श्रीगोंदा,पासून फलटण,साकरवाडी पर्यंत हि चळवळ एकहाती चालवली .खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला . यानंतर मोठ्या जमीनदाराकडील जमिनी काढून घेऊन भूमिहीनांना त्या वाटून देण्यात याव्यात यासाठी कॉ.पी.बी.कडू पाटील यांनी सत्याग्रह केला.त्यामध्ये त्यांना अटक झाली आणि एक महीना येरवडा जेलमध्ये राहावे लागले .

No comments:

Post a Comment