कॉ.पी.बी.कडू पाटील यांचे
स्वातंत्र्यपूर्व काळातील योगदान
महात्मा गांधीजीनी ब्रिटिशाना
हिंदुस्थानातून कायमचे निघून जावे यासाठी शेवटची निर्वाणीची चळवळ करण्याचे ठरवले.ती
चळवळ म्हणजे चलेजाव .भारतीय स्वातंत्र्याच्या या चळवळी मध्ये महाराष्ट्रातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी
भाग घेतला.त्यामध्ये अहमदनगर जिल्हा सुद्धा आघाडीवर होता .भास्करराव दुर्वे ,अण्णासाहेब
शिंदे ,धर्म पोखरकर ,भाऊसाहेब थोरात ,पांडुरंग भांगरे ,कॉ.पी.बी कडू पाटील या
व्यक्तींनी संगमनेर अकोले भागात भूमिगत
राहून कार्य केले.
सातारा
जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकार स्थापन झाले
होते .त्या धर्तीवर संगमनेर अकोले भागात प्रतिसरकार स्थापन करण्याचा प्रयत्न
कॉ.पी.बी.कडू पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला पण त्याला यश आले नाही.
१९४२ च्या
स्वातंत्र्य चळवळमध्ये कॉ.पी.बी.कडू पाटील
शिक्षण अर्धवट सोडून सहभागी झाले . नुसते सहभागी झाले नाही तर भूमिगत होऊन इग्रंज सरकारच्या विरोधात कारवाया करण्यास
सुरुवात केली.त्यामध्ये टेलिफोनचे खांब पाडणे,तारा तोडणे ,रस्ते उखडून टाकणे ,पूल
उद्वस्त करणे ,पोस्टच्या पेटीला आग लावणे ,अशा प्रकारची इंग्रज सरकार विरोधी कामे
ते करत .यानंतर पुन्हा त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यामधील फर्गुसन
कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन एल.एल.बी ची पदवी मिळवली.
No comments:
Post a Comment